काल दिवसभर सगळीकडे एकाच खबर होती की "उद्या म्हणे Snowstorm येणार आहे". या बातमीमुळे इतका गोंधळ की कॉलेज नी सुद्धा सुट्टी declare केली. म्हणे पहाटे पासूनच बर्फ पडणार वगैरे वगैरे.....
सकाळी ७ वाजता जाग आली म्हणून खिडकी उघडून पहिला तर पचकाच झाला सगळा. बर्फ तर सोडाच, पण साधं बर्फाच sample सुद्धा नव्हत..... असा राग आला की मी पुन्हा comforter डोक्यावरून घेउन झोपले.
सकाळी पडणार होता तो बर्फ दुपारी १:३० नंतर हळू-हळू सुरु झाला. आता संध्याकाळचे ६ वाजले आहेत आणि फक्त रस्ता पांढरा होईल इतका बर्फ पडला आहे. या सगळ्या गोंधळात कॉलेज ला सुट्टी होती पण त्यामुळे इतरही सारी कामं अडून बसली.
आज तर काही Snowstorm वगैरे नाही आला, आता म्हणे उद्या येणार आहे. म्हणजे उद्याचे सुद्धा सारे कार्येक्रम तांगणीवर......
आता तरी एकाच गाणे आठवत आहे --
"सांग सांग भोलानाथ बर्फ पडेल का?
कॉलेज भोवती बर्फाचे तळे साचून सुट्टी मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ.........."
No comments:
Post a Comment